बावची पासून पोखरणी रोड दक्षिणेला दोन फिल्म मीटर अंतरावरती श्री नवनाथ मंदिर आहे ते नवनाथ मंदिर लवंगेश्वर मंदिर डोंगर माथा या सानिध्यात आहे. त्याला संतोषगिरी असं म्हणतात मग याचे खास वैशिष्ट्य म्हणजे लवंगेश्वर हे शंकराचेच नाव आहे. मग या डोंगरांमध्ये एकाच दगडाला अशा पाच मुर्त्या आहेत गणपती नंदी शंकर-पार्वती आणि तिन्ही बाजूने बंदिस्त असे मंदिर आणि पूर्वेकडून चौकट असणाऱ्या आणि ते खोल खाली आपल्या जमिनीमध्ये त्या मूर्ती आहेत, मग गेले दोन तीनशे वर्षे झाले ते मूर्ती काढण्याचा बावचीतील सर्व ग्रामस्थ प्रयत्न करतात. परंतु ती मूर्ती ज्यावेळी जेसीबी सहाय्याने खणतात आणि ती मूर्ती एक दुसऱ्या ठिकाणी जाते ती स्वयंभू मूर्ती असल्यामुळे सापडली नाही.
पण जे महात्मे लोक आहेत त्यांनी दृष्टांत दिलेला आहे तिथं स्वयंभू शंकराची पिंड आहे. बंडू देव आमचे बावची गावाचे अध्यात्मिक गुरु आहेत. बंडू देव यांनी सांगितले की या लवंगेश्वर म्हणजे शंकराचेच नाव एकलंगी शिवराय खाली जमिनीमध्ये आहे मग बराच वेळ आम्ही प्रयत्न केले तर काढण्याचा पण ती प्रतिमूर्ती जेसीबी लावल्यानंतर आज साईटला जातील म्हणून आम्ही त्या मंदिरापासून एक दोनशे फूट अंतरावर उत्तरेला एक मूर्ती बसलेली आहे. तिथे सापडलेला एक मूर्तीचा भाग तो शंकराच्या पिंडीचा एक औषेश आहे तर तिथे सर्व बावचीकर पूजा करत आहेत. ज्यावेळी नवनाथ भ्रमण करत आले त्यांना पाणी पिण्यासाठी काय नव्हतं आणि प्रभू श्रीरामचंद्र पण येते वनवासाला या डोंगरांमध्ये येऊन गेले आणि नाथासनी पाणी पिण्यासाठी आणि त्यांना पाणी पिण्यासाठी रामाने बाण मारले डोंगरावरती नंतर ना त्याला एक उंबराचे झाड आले तिथे त्याला आम्ही सर्व लोकं उंबरटाका म्हणतो आणि ज्यांना ज्यांना काशीला जायला मिळत नाही त्यांनी उंबरटाकायाचे दर्शन घ्यायचे अशी सुद्धा म्हण आहे.आणि ज्या टाईमला श्री रामाने बाण मारला तिथे पाणी भरपूर लागलं पाण्याचा झरा कायम स्वरूपी आज तागायन आहे परंतु दुष्काळ पडला त्यामुळे पाणी जरा कमी आले आहे. मग तिथं लोक परडी वगैरे सोडतात त्या पाण्याला, त्या झऱ्यामुळे आसपासच्या विहिरी बोर यांना पाणी कमी अजिबात पडत नाही पाणी कायमस्वरूपी राहते .. आमच्या बावचीगावा पासून 5 किलोमीटर अंतरावर गोटखिंडी हे गाव आहे तेथे धनाजी थोरात म्हणून एक अध्यात्मिक गुरु आहे त्यांना सुद्धा नवनाथ यांनी दृठांत दिलेला आहे. दृष्टांत दिला पासून इतर नवनाथांची मूर्ती बसवून पूजा करण्यात करण्यात चालू केलेले आहे 35 वर्षे तांची पुजा चालू आहेत बावची मध्ये परिसर अतिशय छान आणि शांत असा आहे तरी लोकांनी अवश्य दर्शनाचा लाभ घ्या आणि भेट द्या राम कृष्ण हरी.. सौजन्य - श्री सतीश गवळी, बावची वरील व्हिडिओ मध्ये सर्व माहिती दिलेले श्री सतीश गवळी ( बावची ) यांचे निसर्ग शेती आणि गावं या यूट्यूब चॅनेल यांच्याकडून शतशः आभार..
0 टिप्पण्या
please do not any spam link in the comment box.