भुवनेश्वरी देवी मंदिर भिलवडी (औदुंबर)
औदुंबरच्या पैलतीरावरील श्री भुवनेश्वरी मंदिर आद्य शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.नृसिंह सरस्वती औदुंबर येथे आले. त्याही आधी भुवनेश्वर येथे वसली आहे. रम्य परिसर,दगडी रेखीव हेमांडपंथी मंदिर आहे.मंदिर परिसरात दगडी बुरूज,समोरील दगडी
दिपमाळा,हनुमान,गणपती,काळ्भैरव,महादेवाची छोटी मंदिरे,प्रवेशद्वारे या मंदिराचा परिसर विलोभनिय जाणवतो.भिलवडी गावातून मंदिरापर्यत मार्ग आहे.औदुंबरातील अवधूत नौकेतून कृष्णेचा डोह पार केला की मंदिराची दगडी वाट सुरू होते. मंदिर परिसर प्रशस्त व शांत आहे.देवीची मूर्ती साडेचार फूटी चक्रधारी आहे. मंदिर वास्तुशिल्पाचा वैशिष्टयपूर्ण नमुना आहे.रेखीव दगडांमुळे सौंदर्यात भर पडते.कोणत्याही हवामानात मंदिरातील वातावरण समाधान देणारे जाणवते.समोरील दगडी दीपमाळेवर कंरजाच्या तेलाचे दिवे लावले.मंदिर उजळून निघते.परिसरतील माहेरवाशिणी देवीची ओटी भरून जातात.
ओदुंबरला येणारे भाविक हमखास या देवी च्या दर्शनासाठी येतात. एकदा अचानक एक विलक्षण गोष्ट घडली श्रीगुरु औदुंबर वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते. एक मुलगा धावत आला आणि त्याने त्यांच्या चरणावर लोटांगण घातले. श्रीगुरुंनी डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिले. पण तो मुलगा बोलू शकत नव्हता. त्याने तोंड उघडले तेव्हा ते रक्तबंबाळ झाले होते. त्याची जीभ कापली होती. श्रीगुरुंनी अंत:र्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला. तो मुलगा कोल्हापूर येथील एका वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचा मुलगा होता. पण तो मंद बुद्धीचा होता. ते पाहून अतिशय दु:खाने त्याचे आई वडील जग सोडून गेले. त्यामुळे तो मुलगा अनाथ होऊन भटकू लागला. कदाचित उपनयन झाल्यावर तो सुधारेल म्हणून गावातील लोकांनी त्याची मुंज लावून दिली. परंतु त्याच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. सर्वजण त्याची खिल्लि उडवत आणि त्याला मारझोड करीत असत.
शेवटी तो गाव सोडून फिरत फिरत भूवनेश्वरी मातेच्या मंदिराजवळ आला. तिथे तो अन्नपाण्याशिवाय तीन दिवस देवीच्या समोर बसून राहिला. तरीही देवी प्रसन्न न झाल्यामुळे त्याने आपली जीभ कापून ती देवीला अर्पण केली आणि तो जीव देण्यासाठी कृष्णेच्या डोहाकडे निघाला. त्यावेळी देवी त्याला म्हणाली की तू समोरच्या तीरावरील औदुंबर वृक्षाखाली बसलेल्या सद्गुरु यतींकडे जा. ते तुझा उद्धार करतील. आता तो श्रीगुरुंच्या पायाशी बसून अश्रू ढाळीत होता. श्रीगुरुंचे मन द्रवले. त्यांनी अतिशय प्रेमाने त्याच्या पाठीवरुन हात फिरवला. त्याचबरोबर त्याची जीभ पूर्व वत झाली. त्याने श्रीगुरुंच्या चरणी विनवणी केली की मला ज्ञान द्या. श्रीगुरुंनी कृपा करुन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झाले.
श्री गुरूचरित्राच्या 17 व्या अध्यायात भुवनेश्वरी देवी चा ऊल्लेख आहे व तिने मतीमंद बालकास केलेल्या ऊपदेशानुसार तो बालक श्रीनृसिंह सरस्वती स्वामींच्या दर्शनास गेला त्यावर सदगुरूंची कृपा होऊन त्यास ज्ञान प्राप्ती झाली.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.. आवडल्यास तुमच्या मित्र परिवारा सोबत शेअर करा..
आमचा Video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
अधिक माहितीसाठी संपर्क :- श्री. श्रीपाद प्रकाश गुरव - भुवनेश्वरवाडी, भिलवडी
मोबाईल नं - +९१ ८९५६१९७६३०
Location Map - https://maps.app.goo.gl/LEBowzs3En8JX...
Bhuvaneshwari Temple Bus Stop, Buwaneshwarwadi, Bhuvaneshwarwadi, Bhilawadi, Maharashtra 416303
0 टिप्पण्या
please do not any spam link in the comment box.