श्री लक्ष्मी नृसिंह मंदीर I Shri Lakshmi Narasimha Temple I Kole Narsinhpur Jwala Narsimha

 श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह तीर्थ मंदिर, कोळे नरसिंहपूर | Shri Kshetra Jwala Narasimha Theertha Mandir, Kole Narasimhapur

एक प्राचीन नृसिंह मंदिर ज्याचा इतिहास थक्क करणारा आहे. येथील मूर्ती हि शालिग्राम शिळे पासून बनलेली असून, ही जगातील सर्वात मोठी शालिग्राम मूर्ती आहे.

री क्षेत्र ज्वाला नृसिंह मंदिर हे दक्षिण वाहिनी नदी असलेल्या कृष्णा नदीच्या काठावर वसलेले, वाळवा तालुक्यातील नरसिंहपुर गाव. येथील नरसिंह मंदिर ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. इंग्रजांनी ज्यांच्या विरोधात शोध मोहीम चालवली होती असे अनेक क्रांतिकारक भूमिगत होऊन येथे येऊन राहिले होते. जमिनीच्या खाली दोन मजले उतरून गेल्यावर लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती दिसते तर शेजारीच कृष्णामाई वाहत असल्याने नदीचे ही पाणी खालच्या बाजूला येते. या नदीच्या पाण्यातच पाय बुडवून चालत मूर्ती जवळ जाता येते.

भारतातील नरसिंह देवस्थानांपैकी नरसिंहपूर हे एक देवस्थान आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे हे मंदिर असून दरवर्षी उत्सवासाठी राज्यातून लाखो भाविक येतात. शासनाकडून या तीर्थक्षेत्राला मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. प्रतिवर्षी वैशाख शुद्ध सप्तमीपासून दहा दिवस नरसिंह जयंती उत्सव साजरा केला जात आहे.

श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह मंदिर, दोन हजार वर्षांची आध्यात्मिक परंपरा:

श्री क्षेत्र कोळे नरसिंहपुर ला दोन हजार वर्षांची आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. भुयारांतरीची ही शोडशभुज नरसिंह देवता मंदिर आणि संत महंत तपस्वी विभूतींच्या वास्तव्याने पवित्र परिसर यामुळे सर्व पारमार्थिक पंथीयांच्या पाऊलपणा या गावात पहावयास मिळतात. सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही सुरू आहे.

हेमाडपंथी मंदिर वास्तुकला:

मंदिराचा पूर्व दरवाजा घडीव आणि दगडी आहे. नरसिंह मंदिराच्या पहिल्या उंबरठ्यावर येतात मंदिराचा दिंडी दरवाजा आहे. दिंडी दरवाजावरील विघ्नहर्ता गणेश नम्र भावनेने मंदिरात चला असे सुचवतो. या ठिकाणी कृष्णामाईने वळण घेतलेले बारा किमी लांबीचे पात्र डोळ्यात मावत नाही.

श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह तीर्थ मंदिरातील मूर्ती चे वर्णन | Description of idols in Sri Kshetra Jwala Narasimha Tirtha Temple

कोळे नरसिंहपूर येथील नरसिंहाची मूर्ती शाळीग्रामची आहे. हे परमेश्वराचे स्वयंभू रूप आहे. परमेश्वराचे रूप अत्यंत प्रभावी आणि डोळ्यांना सुखावणारे आहे. या मूर्तीमध्ये 16 हात असलेले भगवान हिरण्यकशपू राक्षसाला घट्ट धरलेले दिसतात.

स्थानिक पातळीवर “ज्वाला नरसिंह” म्हणून ओळखले जाते, एका पायावर उभे असलेले व सोळा हात असलेले भगवान हजारो वर्षांपासून त्यांच्या भक्तांचे रक्षण करत आहेत.

कोळे नरसिंहपूर येथील नरसिंहाच्या या मूर्तीवर भगवान विष्णूच्या विविध अवतारांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. प्रभूच्या डाव्या बाजूला भक्त प्रल्हाद आणि देवी महालक्ष्मीची रूपे दिसतात, तर त्यांच्या उजव्या बाजूला देवी भूदेवी आणि भगवान विष्णूचे वाहन गरुड आहेत. त्याच्या हातावर आणि अंगठ्यांवर “बाजुबंध” सारखे विविध दागिने दिसतात जे त्याला अधिक सुंदर बनवतात. मूर्तीचे सौंदर्य वर्णन करण्यापलीकडे आहे. भगवान नृसिंहाच्या या रूपाचे दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटते. त्याचसोबत भगवान नरसिंहाच्या रूपाभोवती प्रसिद्ध दशावतार यांचे अद्भुत कोरीवकाम आहे.


Contact Us: 

निसर्ग शेती आणि गांव I Nature Agriculture and Village


1) About Kole Narasimhpur Temple

2) 2000 Years Old temple of Sangli district, Maharashtra

3) Location of  Kole Narasimhpur Temple

4) Beautiful nature view of River Krishna

5) Story of Kole Narasimhpur Temple

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

निसर्गशक्तीचे प्रतीक श्रीगणेश I गणेशखिंड I Shri Ganesh I Gnapati I Ganeshkhind Bhavaninagar Sangli