श्री नृसिंह यात्रा उत्सव २०२४ I Narasimha Yatra I नृसिंह ग्रामदैवत जुळेवाडी I Narsinh Yatra Julewadi I Julewadi-Tasgaon-Sangli

 जुळेवाडी गावाचे नृसिंह देवालय हे ग्रामदैवत आहे. गावापासून ९०० मीटर अंतरावर नृसिंह देवालय आहे. या नृसिंह देवाची यात्रा चैत्र शुद्ध द्वादशीला भरते.नृसिंह देवाचा उत्सव थाटामाटामध्ये साजरा केला जातो. नृसिंह उत्सवामध्ये नृसिंह पालखी सोहळा असतो. नृसिंह पालखी सोहळा त्रयोदशीला पहाटे पाच वाजता असतो. दररोज सकाळी सहा वाजता नृसिंह देवाची आरती नित्य नियमाने केली जाते. अमावस्येला नृसिंह देवालयामध्ये महाप्रसाद असतो.

नृसिंह यात्रे दिवशी रात्री १२.०० वाजल्यापासून सकाळी ६.०० वाजेपर्यंत सर्व भक्त नृसिंह देवालयाला दंडस्नान घालतात. दुपारी १२.०० वाजता तोरणा पताकांचा कार्यक्रम असतो. या तोरणा पताका घेवून सर्व भक्त लक्ष्मी मंदिरातून नृसिंह देवालयाकडे जातात. या तोरण पताका नृसिंह देवालयापर्यंत वाजवत घेवून जाण्याचा मान श्री. विश्वनाथ बापू कोकाटे यांच्याकडे असतो. त्या ठिकाणी तोरण पताका लावून श्रीफळ वाढवून नृसिंह देवाला पुरण-पोळी चा नैवेद्य दाखवला जातो. दिवसभर दर्शनासाठी अलोट गर्दी भरलेली असते. रात्री यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम असतात.

रात्री १२.०० नंतर नृसिंह देवाच्या पालखीची सजावट केली जाते व देवाचा मुकुट पालखीमध्ये ठेवला जातो. भुनेश्वरवाडी येथील श्री. प्रकाश श्रीपाद  गुरव हे नृसिंह देवाचे पुजारी आहेत. पूर्वीपासून नृसिंह देवाच्या एका मुकुटाचा मान श्री. दत्तू दाजी खोत व दुसऱ्या मुकुटाचा मान श्री.अनिल शंकरराव पाटील यांच्याकडे आहे. पालखीच्या पुढील बाजूस खांदा देण्याचा मान श्री. विठ्ठल तातोबा फडतरे यांचा आहे तर मागील बाजूस खांदा देण्याचा मान श्री. अशोक बापू कवठेकर यांचा आहे. देवाची झालर घेण्याचा मान श्री.कुलदीप धर्मेंद्र मस्के यांचा आहे. या गावाचे एक वैशिष्ट मानावे लागेल की, आसपासच्या सर्व गावामध्ये यात्रेचा पालखी सोहळा रात्री असतो पण आमच्या गावची नृसिंह देवाची पालखी पहाटे ५.०० वाजता निघते. 

लक्ष्मी मंदिर ते नृसिंह देवालय या पालखी जाण्याच्या मार्गावर विद्युत रोषणाई व भव्य आतिषबाजी केली जाते. पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. काही नवस बोललेले भक्त पेढे वाटतात. पालखी नंतर लक्ष्मी मंदिरात आणून ठेवली जाते. त्या नंतर महाप्रसाद वाटप केले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा प्रकारे नृसिंह देवाची यात्रा पार पाडली जाते.

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.. आवडल्यास तुमच्या मित्र परिवारा सोबत शेअर करा..

आमचा Video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! 

Location Map

नरसिंह मंदिर - 2GF4+3PC, Julewadi, Maharashtra 416308

https://maps.app.goo.gl/ZFmxbkMwHh1zuy6T6

विशेष सहकार्य - छायाचित्रण संचालक (DoP)

शंतनू कोळेकर (कॅमेरामन - 9766864342)


Contact Us: 

निसर्ग शेती आणि गांव I Nature Agriculture and Village

YouTube :- www.youtube.com/@UCW6GHXFyeC-2z_dRPUU6MfQ 

Blog - https://natureagricultureandvillage.blogspot.com

Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61553464371433

Watch this video 👇

😲 प्राचीन कालीन श्री वीरभद्र देवस्थान कुंडल ।  Ancient Sri Veerbhadra Temple Kundal

https://youtu.be/teofHobMpEc

😲 श्री नवनाथ I नवनाथ I नवनाथ महाराज I Shree Navnath I Navnath I Navnath Temple  Ashta

https://youtu.be/-zGxGMDOaao

😲 ब्रह्मनाळ सांगलीच्या कुशीत लपलेले एक ऐतिहासिक रहस्यमय ठिकाण । Sangli  Bramhanal

https://youtu.be/qdf8qfWQISg

😲 श्री रामलिंग बेट  | Ramling Bet Bahe | Shri Ram Temple Bahe | Ramling Island I Sangli-Islampur 🚩🙏🚩

https://youtu.be/6pBfL6zpVU4

😲  श्री लक्ष्मी नृसिंह मंदीर  I Shri Lakshmi Narasimha Temple I Kole Narsinhpur  Jwala Narsimha

https://youtu.be/QDebsua7c_Y

😲  किल्लेमच्छिंद्रगड I Kille Machindragad I Shree Machindranath I Machindragad Fort Trek Sangli

https://youtu.be/kKgR2bbdSx0

😲 नवसाला पावणारा गणपती I शिपोशी रत्नागिरी लांजा I Ganpati Vlog I Shiposhi Ratnagiri Lanja I Kokan

https://youtu.be/5ONuoXRT1TQ

😲 शिकोबा डोंगर I Shikoba Dongar I Shikoba Manerajuri I Vlog I Hill Station 

Vlogs I Tasgaon Sangli

https://youtu.be/1xSWXESI5wg

😲 श्री मल्लिकार्जुन I मल्लिकार्जुन मंदिर I विलासगड येडेनिपाणी I Mallikarjun Temple I Yedenipani

https://youtu.be/4A-_CpNtpds

😲 पेड पाझर तलाव I Ped Talav I पाझर तलाव I Pazar Talav I पेड तासगाव I Ped Tasgaon Sangli

https://youtu.be/AHPx4r4C5AA

😲 दरगोबा देवस्थान विटा पारे I दरगोबा मंदिर I Dargoba Mandir I Dargoba Temple I Vita-Pare Sangli

https://youtu.be/TN1RK3_Dy-8

😲 येरळा नदी दुष्काळी तालुक्यातील लोकांची जीवनदायिनी । Yerala Nadi I Yerala River I Life Giver

https://youtu.be/qO2TwS8kJRc

😲 निसर्गाच्या सानिध्यात श्री कुलस्वामिनीचे दर्शन । Darshan of kulaswamini In The Presence Of Nature

https://youtu.be/HCb8xFwBzXQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

निसर्गशक्तीचे प्रतीक श्रीगणेश I गणेशखिंड I Shri Ganesh I Gnapati I Ganeshkhind Bhavaninagar Sangli