तासगाव तालुक्यातील पेड नैसर्गिक देणगी लाभलेले गाव आहे. निळ्याशार पाण्याचा तलाव, समृध्द वनराई व इतिहासाची साक्ष देणारे वाडे पर्यटकांना आकर्षित करतात डोंगरदर्यात वसलेल्या गावात पेशव्यांचा तळ होता.गावाच्या आसपासच्या डोंगर माथ्यावरून दृष्टीक्षेप टाकला तर गावातील सुपीक जमीन,पाण्याने भरलेला तलाव मन मोहून टाकतो.वनीकरण या विभागाच्या परिश्रमामुळे या तलावाच्या बाजूला हिरवीगार जंगलझाडी वाढली आहे.
या ठिकाणी शिरस बाभूळ, काशीद, लिंब, निलगिरी, साग, सीताफळ, चिंच, पेरू, बोर, सुरू, चिक्कू, चंदन, आंबा इ.सत्तरहून अधिक जातीची झाडे फळ्झाडे येथे आहेत.या ठिकाणी साळीदर, घोरपड, बहीरी ससाणा, मोर, वानर, लांडगा आदी प्राण्याचा वापर आहे.तासगाव तालुक्यातील सर्वात जास्त मोराची सख्या येथे आहे.या ठिकाणचे दृश्य पर्यटकांचे मन मोडून टाकते.या ठिकाणी विश्रामगृहे, रस्ते, युवकगृहे, वन कर्मचार्यांची निवासस्थाने यांची चांगली सोय करण्यात आली आहे. दरवर्षी परिसरातील शाळा महाविद्यालये यांच्या सहली या ठिकाणी आवर्जून येतात. वनविभागाची रोपे तयार करण्याची यंत्रणा असल्यामुळे वर्षभर या ठिकाणी विविध रोपे तयार करून विकली जातात.या ठिकाणी मोठया प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.या गावात बिरोबा मंदीर आहे दरवर्षी फेब्रुवारीत मोठी यात्रा भरते.येथे आरेवाडीच्या धरतीवर झाडांच्या बनांची योजना आखण्यात येत आहे. पेडचा परिसर चारी बाजूनी डोंगरानी वेढलेला आहे. याच डोंगरावर हिरवीगार वनराई आहे.निसर्गाची समृध्द साथ असल्याने ह परिसर आकर्षक ठरला आहे. या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Video बघत रहा. धन्यवाद. Contact Us: निसर्ग शेती आणि गांव I Nature Agriculture and Village YouTube :- https://www.youtube.com/channel/UCW6GHXFyeC-2z_dRPUU6MfQ Blog - https://natureagricultureandvillage.blogspot.com Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61553464371433 Watch this video 👇 😲 प्राचीन कालीन श्री वीरभद्र देवस्थान कुंडल । Ancient Sri Veerbhadra Temple Kundal https://youtu.be/teofHobMpEc 😲 गहू पीक - भाग ३ खतव्यवस्थापन । Wheat crop fertilizer management https://youtu.be/teofHobMpEc 😲 ब्रह्मनाळ सांगलीच्या कुशीत लपलेले एक ऐतिहासिक रहस्यमय ठिकाण । Sangli Bramhanal https://youtu.be/qdf8qfWQISg 😲 निसर्ग शेती आणि गांव । Nature Agriculture and Village https://youtu.be/W7qmhohKfVo
0 टिप्पण्या
please do not any spam link in the comment box.