या व्हिडीओ मध्ये आपण कुंडल डोंगरावरील वीरभद्र देवाचे मंदिर परीसर आणि दर्शन घेणार आहोत. कुंडल डोंगरावरील वीरभद्र कुंडल हे गाव सांगली जिल्ह्य़ातील पलुस तालुक्यातील आहे.
कुंडल गावाच्या पश्चिमेकडील डोंगरावरील श्री वीरभद्र देवस्थान आहे.हे लिगायत समाजाचे देवस्थान आहे. डोंगरावर असलेली बहामनी कालीन लेणी ( गुहा ) वैशिष्टपूर्ण आहेत. गावाच्या पश्चिमेस असलेला श्री वीरभद्र डोंगर पर्वताच्या रांगाचे शेवटचे टोक आहे. श्री वीरभद्र देवस्थान जमिनीच्या सपाटीपासून ३०० फूट उंचीवर आहे.मूर्ती तीन फूट उंचीची आहे. प्रतीवर्षी कार्तिक आमावस्येला येथे यात्रा भरते. श्री वीरभद्रदेवीचा विवाह सोहळा विविध कार्यक्र्मांनी होतो.यासाठी महाराष्ट्रातून,कर्नाटकातून मोठया प्रमाणात भाविक येतात.यासाठी बाजरीची भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेचा असा प्रसाद असतो. डोंगरावर वीज,पाणी निवासाची सोय आहे. सांगली ते कुंडल अंतर - 42 कि.मी / पलुस ते कुंडल अंतर - 5.5 कि.मी /कराड ते कुंडल अंतर - 32 कि.मी कुंडल गावच्या पश्चिमेकडील डोंगरावर श्री वीरभद्र देवस्थान आहे .हे लिंगायत समाजाचे देवस्थान आहे. डोंगरावर असलेली बहामनीकालीन लेणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक वर्षी कार्तिक अमावस्याला येथे यात्रा भरते. महाराष्ट्रातून तसेच कर्नाटका मधून सुद्धा मोठ्या संख्येने भाविक येतात. बाजरीची भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा असा प्रसाद असतो. डोंगरावर वीज पाणी व निवासाची सोय आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कुंडल हे गाव येते. कुंडल हे ऐतिहासिक ठिकाण आहे. कुंडलचे प्राचीन नाव कौडण्यपूर हे होते. या डोंगररांगावर सिता जानकीचा डोंगर आहे. त्यावरती श्री राम लक्ष्मण सीता चे मंदिर आहे तसेच हनुमंताची मूर्ती व जटायू पक्षाची मूर्ती शिल्प सूंदर कोरण्यात आले आहे. या कुंडल डोंगरावरच गिरी पार्श्वनाथ हे मंदिर आहे. प्रत्येक वर्षी श्रावणातील शेवटच्या सोमवारी येथे खूप मोठी यात्रा भरते. कुंडल हे क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांती अग्रणी जी डी बापू लाड, क्रांतिवीर आकाराम पवार, क्रांतिवीर आर एस पवार, कॅप्टन रामभाऊ लाड ,खाशेराव पवार, यशवंत पवार, शंकर जंगम असे अनेक क्रांतिवीर होऊन गेले. कुंडल गाव क्रांतिवीरांचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच महाराष्ट्रात दोन नंबरचे कुस्ती मैदान हे कुंडलाचेच आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवानंतर येथे कुस्ती मैदान भरवले जाते. संपुर्ण भारतातून अनेक मल्य येथे आपले नशीब आजमावण्यासाठी येतात. अलीकडे कुंडल चा डोंगर हा उत्तम ट्रेकिंग साठी म्हणून प्रसिध्द झाला आहे,आसपासच्या गावातून अनेक लोक भल्या पहाटे ट्रेक साठी येतात.इथली हवा अतिशय स्वच्छ आल्हाददायक आहे. Contact Us: निसर्ग शेती आणि गांव I Nature Agriculture and Village YouTube :- https://www.youtube.com/channel/UCW6GHXFyeC-2z_dRPUU6MfQ Blog : https://natureagricultureandvillage.blogspot.com Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=61553464371433
0 टिप्पण्या
please do not any spam link in the comment box.