श्री कुलस्वामिनी वाकाईदेवीच मंदिर हे पनुब्रे वाकाईवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथे आहे. श्री वाकाईदेवीची यात्रा दरवर्शी दसरा या दिवशी असते गावातील तसेच गावाबाहेरली लोक एकत्र येऊन साजरी करतात त्यावेळी सायंकाळी श्री वाकाईदेवीची पालखी निघते पालखी समोर गुलाल उधळला जातो तसेच फटाके फोडले जातात. यात्रा दोन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी देवीला गोड निवद दाखवला जातो व दुसऱ्या दिवशी गावातील लोक पाहुण्यांना मटण चिकन या जेवणाचा पाहुणचार केला जातो.
गावातील लोकांचा बहुतेक व्यवसाय हा शेती त्याला जोडून जोड व्यवसाय गाई, म्हशी, शेळी कोमडी पालन केले जाते, गावातील बहुतेक लोक हे बाहेर मुंबई पुणे अश्या ठिकाणी कामानिमित्त आहेत. गाव आणि गावाजवळील परिसर हा डोंगर, दरी, घनदाट झाडी यांनी व्यापलेला आहे. तेथे सर्व बाजुंनी निर्सग रम्य वातावरण आहे.
श्री वाकाईदेवीची कथा :
येथील पूर्वीचे लोक सांगत आहेत कि, वारुण पनुब्रे गावामध्ये एक शेतकरी राहात होता तो रोज गाई आणि म्हेस घेऊन डोंगरामध्ये घेऊन चरायला जात होता. एके दिवशी असे नवल घडले त्या कळपातील एक गाय रोज आपल्या दुधाचा अभिषेख घालत होती.
हे असे रोजच सुरु होते ते त्या शेतकऱ्याला माहिती नव्हते एके दिवशी ते शेतकऱ्याने बघितले त्याला आश्चर्याचा धक्काच बसला हि सर्व हकीकत त्याने गावातील लोकांना सांगितली गावातील लोकांनी असा तर्क मांडला कि ज्या अर्थी गाई तेथे दुधाचा अभिषेख घालत आहे त्याअर्थी काहीतरी दैवी चमत्कार असणार आहे.
गावातील सर्व लोक जमून तेथे गेले ती जागा खणू लागले तिथे त्यांना देवीची मूर्ती सापडली तीच हि श्री वाकाईदेवी.
श्री क्षेत्र जोतिबा :
श्री जोतिबा मंदिर हे शिंपे सवते शाहूवाडी तालुका, जिल्हा कोल्हापूर यथे आहे. गावातील लोकांचे हे ग्रामदैवत आहे. श्री जोतिबाची यात्रा गावातील लोक हे चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीनंतर तिसऱ्या दिवशी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते.
गावातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे सर्व लोक येथे गुण्या गोविंद्याने राहतात.
.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही मार्गदर्शन सूचना असतील तर नक्कीच सांगा आम्ही त्या पुढील व्हिडिओ मध्ये पूर्ण करू आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
Contact :
https://www.facebook.com/profile.php?id=61553464371433
0 टिप्पण्या
please do not any spam link in the comment box.