गहू पीक भाग ४ - औषध फवारणी I Wheat Crop Spraying

 गहू पीक औषध फवारणी :-

   कॉन्टाफ (तांबेरा रोगावर), बायोझाइम (टॉनिक), हमला ५५० ( किटक नाशक ), १३-४०-१३ (NPK) 

या व्हिडिओमध्ये  सर्व फवारणीबद्दल माहिती दिली आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा. 

मावा किडीचा प्रादुर्भाव लक्षात घ्या 

•  अनेक वेळा शेतकरी मावा किडीच्या विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकल्या जाणाऱ्या चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशीला तांबेरा समजून तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी सुचविलेल्या उपायांचा अवलंब करतात. असे केल्याने मावा किडीचे नियंत्रण होत नाही. परिणामी, गहू पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

•  माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखण्यासाठी चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशीच्या ठिकाणी बारीक काठीने किंवा गव्हाच्या पानाच्या साहाय्याने स्पर्श करावा. त्यातून माव्याची हालचाल होताना सहज दिसते. त्यामुळे मावा किंवा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ओळखता येतो.

गव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार, नियंत्रण  

विविध भागांत तापमानाच्या अनुकूलतेनुसार गव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार आढळतात. महाराष्ट्रात व दक्षिण मध्य भारतात खोडावरील काळा तांबेरा व पानांवरील नारिंगी तांबेरा हे दोनच प्रकार आढळून येतात. उत्तर भारत व दक्षिण भारतातील निलगिरी पर्वत परिसरात पिवळा तांबेरा दिसून येतो. खोडावरील काळा तांबेरा  प्रादुर्भाव आणि लक्षणे : हा रोग पीक ओंबीच्या अवस्थेत असताना दिसतो. गव्हाचे खोड, पानांचे देठ, पाने, ओंबी, कुसळे इत्यादी सर्वच भागांवर या रोगाची लक्षणे दिसतात.


Spraying wheat crop :-

   Contaf (against Tambera disease), Biozyme (Tonic), Hamala 550 (Insecticide), 13-40-13 (NPK)

In this video, all information about spraying is given. Please watch this video in full.

Note the infestation of the Mawa Kidi

• Many a times farmers mistake the black fungus in the form of sticky liquid which is deposited on the leaves, stem and young shoots of wheat by the droppings of Mawa caterpillar as tambera and adopt the suggested measures for control of tambera disease. Doing this does not control the mava pest. Consequently, the yield of wheat crop is adversely affected.

To detect the presence of mold infestation, touch the black fungus in the form of a sticky liquid with a thin stick or a wheat leaf. It is easy to see the mother's movement. Hence the incidence of Mawa or Tambera disease can be identified.

Types of copper blight on wheat, control

Varieties of wheat rust are found according to the temperature suitability in different regions. In Maharashtra and South Central India, only two species are found, Black Tambera on the trunk and Orange Tambera on the leaves. Yellow copper is found in the Nilgiri mountains of North India and South India. Black on trunk Black Tambera infestation and symptoms on stem : This disease appears when the crop is in bud stage. The symptoms of this disease are seen on all parts of wheat stem, leaf stalks, leaves, ombs, pods etc.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

निसर्गशक्तीचे प्रतीक श्रीगणेश I गणेशखिंड I Shri Ganesh I Gnapati I Ganeshkhind Bhavaninagar Sangli