पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच शेतकरी मटका मिसळ । West Maharashtra's First Farmer MatkaMisal

हॉटेल शेतकरी 
पत्ता - शेतकरी प्युअर व्हेज हॉटेल, पेठ-शिराळा रोड, बी. आर. पाटील सर मळा, रेठरे धरण, ता. वाळवा जि. सांगली, संपर्क : 7219263829 

 गेल्या 3 वर्षांपासून आपल्या सेवेत सांगली,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पहिली ** शेतकरी झणझणीतमटका मिसळ हाऊस * मटका मिसळ खायला लागत्याच!!!* उन्हाळा असो , पावसाळा असो , की हिवाळा,,, शेतकरी मटका मिसळ म्हंटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो मातीचा मटका , गरम गरम रस्सा , कांदा,लिंबु , पापड , दही, मटक्यात शेवपुरी, अन सोबत खरपूस भाजलेली मोड आलेले मटकी...आणि मठ्ठा - जिलेबी मग काय नादखुळाच... आणि हो गावरान पिठलं भाकरी आणि आपली अख्खा मसुरा पण हाय कि राव...आस्स !! तोंडाला पाणी सुटत आणि मग आपोआप गाडीची चाकं वळतात ती पेठ शिराळा रोड वर , रेठरे पाझर तलावा शेजारी आणि गाडी थांबतेबी.आर.पाटील सरांच्या मळ्यात प्रसिद्ध शेतकरी हॉटेल वर!!!! 

तिथे बसून दिसतो रेठऱ्याचा सुंदर पाझर तलाव, हिरवागार डोंगर आणि शेतकरी कट्ट्यावर बसून झणझणीत मटका मिसळ खाताना आलेली थंडगर वाऱ्याची झुळूक....!! आहाहा...!! कसं मन तृप्त होऊन गेलं...!! विकेंड सुरू होत आहे. मटका वाट पाहत आहे. मठ्ठा तयार होऊ लागला आहे. 

जिलेबीने वळसे घ्यायला सुरुवात केली आहे. पावाने तर कधीपासून टेबलाकडे नजर लावली आहे. या लवकर, गरमागरम मटका मिसळ खायला. (खायला लागत्याच) डोळ्यांदेखत उगवलेलं धान्य, डोळ्यांदेखत केलेला स्वयंपाक आणि डोळ्यांनी निसर्गसौंदर्य न्याहाळत पिठलं-भाकरीवर मारलेला ताव... विकेंड विकेंड म्हणतात तो हाच... या लवकर... भाकऱ्या गार व्हायच्या आत.... चला तर मग हॉटेल शेतकरीला आपण आपल्या फॅमिलीसोबत एकवेळ अवष्य भेट द्या

Contact: https://www.facebook.com/profile.php?id=61553464371433



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

निसर्गशक्तीचे प्रतीक श्रीगणेश I गणेशखिंड I Shri Ganesh I Gnapati I Ganeshkhind Bhavaninagar Sangli